आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चौकशीच्या बहाण्याने १९ लाख लुबाडले

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : मोबाईल वरून संपर्क साधून तुमच्या विरुद्ध मनी लाँड्रींगची केस दाखल करण्यात आली आहे. त्यासाठी तुमची चौकशी करावी लागेल, अशी भीती दाखवून युवकाचे १९ लाख रुपये लंपास केल्याची घटना वडगाव शेरी परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखी ने त्यांच्याशी फोन वरून ७ मे रोजी संपर्क साधला.

त्याला चौकशीच्या बहाण्याने बँक खात्यात वेळोवेळी रकमा भरण्यास भाग पाडल्या व १९ लाख रुपयांची फसवणुक केली.

हा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण हे करीत आहेत.

get_footer();