आवृत्ती पुणे
← Back to Homepage

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी : प्रा. कोळेकर

Spread the love

भूम : छत्रपती शिवाजी महाराज हे एक सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी व शासनकर्ते होते असे प्रतिपादन प्रख्यात वक्ते प्रा. नितिन कोळेकर यांनी व्यक्त केले.

शंकरराव पाटील महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज प्रा.नितिन कोळेकर यांचे व्याख्यान महाविद्यालयातील इतिहास, समाजशात्र व NSS विभाग यांच्या संयुक्त विद्यमनाने आयोजित केले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकृष्ण चंदनशिव उपस्थित होते. या प्रसंगी मंडळ सहसचिव प्रा. संतोष शिंदे, उपप्राचार्य डॉ. दयानंद शिंदे, डॉ. अनुराधा जगदाळे उपस्थित होते.कार्यक्रमांची सुरुवात जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी नितिन कोळेकर यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रत्येक घडामोडीवर प्रकाश टाकला.

यावेळी महाविद्यालयतील प्रा. डॉ. के. जी. गव्हाणे, तानाजी बोराडे, गौतम तिजारे, एन. डी. पडवळ, जी. एच. सुरवसे, ए .डी. दूनघाव, रमेश एस. गायकवाड यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नंदू जगदाळे यांनी तर आभार प्रा. गोपाल खंदारे यांनी मानले.

get_footer();