आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जबरी चोरीचा बनाव करणारे २४ तासात अटकेत

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Police • February 2, 2024
Spread the love

12 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : जबरी चोरीचा बनाव करणा-या सर्व आरोपींना मुद्देमालासह २४ तासामध्ये पुणे-मुंबई येथून अटक करण्यात आली.

हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी वसिम खान, (वय २७ वर्षे, रा. बांद्रा टर्मिनस बांद्रा मुंबई) मोहम्मद मेहफुज शौकत खान, (वय २५ वर्षे रा. गोवंडी शिवाजीनगर, मुंबई) मोहम्मद साकिब अय्याज खान, (वय २४ वर्षे, रा. गोवंडी, शिवाजीनगर, फिट रोड, मुंबई) गुफरान खान, (वय २३ वर्षे) यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली सर्व मालमत्ता १२,२०,००० रुपये हस्तगत करण्यात आली आहे. फिर्यादी यांचा ट्रांन्सपोर्टचा व्यवसाय आहे. ते मुंबई-पुणे परिसरात मालाची वाहतुक करण्याकरीता टॅम्पो पुरवण्याचे काम तसेच वेगवेगळ्या व्यापा-यांकडून कपडे सप्लाय करण्याचे काम करीत असतात. सुहाना मसाला चौक, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, हडपसर या ठिकाणी त्यांच्याकडे कामास असणारे कामगार हे त्यांच्याकडील टेम्पो घेऊन माल वितरीत करण्याकरिता जात होते.
तेव्हा दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांचा टेंम्पो अडवुन टेम्पोमधील माल आणि मोबाईल हॅण्डसेट हे जबरदस्तीने चोरुन नेलेला होता. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी तपास पथक अधिकारी, अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपासपथक अधिकारी अर्जुन कुदळे, अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
परंतु काही एक उपयुक्त माहिती मिळून आली नाही. त्यामुळे फिर्यादी यांच्याकडे १ वर्षापासून काम पाहणारा कामगार वसिम खान आणि त्याचा भाऊ मेहफस खान यांच्याकडे कौशल्यपुर्वक तपास केला. त्यांनी त्यांच्या गोवंडी मुंबई येथील सहका-यांच्या संगनमताने सदर टेंम्पो व माल अपहार करून मुंबई येथे पाठवला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार अजित मदने, अनिरूध्द सोनवणे, चंद्रकांत रेजीतवाड यांनी मुंबई येथे जाऊन आरोपी व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेतला असता ते मिळून आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ५ आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अश्विनी राख, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे व संदीप शिवले, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमित साखरे यांनी केली आहे.

get_footer();