आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जबरी चोरी करणाऱ्या पक्या परिहारला अटक

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Police • February 26, 2024
Spread the love

मार्केटयार्ड पोलीसांची कामगिरी

पुणे : जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात मार्केटयार्ड पोलीसांना यश आले आहे. प्रकाश परिहार ऊर्फ पक्या (वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर) याला अटक करण्यात आली आहे.

पक्या (वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडुन ८५,००० रुपये किमतीचे ६ मोबाईल, १०,००० रुपये किमतीची एक अॅक्टीव्हा मोपेड व धारदार हत्यार असा एकुण ९५,१०० रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

मार्केटयार्ड पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रकाश परिहार ऊर्फ पक्या याने आंबेडकरनगर परिसरात एका व्यक्तीस धारदार हत्यार दाखवुन मोबाईल व रोख रक्कम चोरी केली.

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील शिवजयंतीनिमित्त मिरवणुक असल्याने रेकॉर्डवरील आरोपी चेक करण्यासाठी तपास पथकातील कांबळे व स्टाफ यांच्यासह मार्केटयार्ड रिक्षा स्टॅन्ड येथे पेट्रोलींग करीत होते.

पोलीस अंमलदार गायकवाड यांना, माहिती मिळाली की, प्रकाश परिहार ऊर्फ पक्या हा शारदा गजानन मंदिराशेजारील पान टपरी शेजारी उभा आहे.

शारदा गजानन मंदिराशेजारी आडबाजुस उभे राहुन पाहणी केली असता, प्रकाश परिहार ऊर्फ पक्या हा पान टपरी समोर उभा असल्याचे दिसले. तो, पोलिसांना पाहुन पळुन जात असताना त्याला पकडले.

त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याला दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अॅक्टीव्हा चोरीबाबत गुन्हा दाखल असून दोन गुन्हे उघड करण्यात झाले आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ५ चे पोलीस उपआयुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस अंमलदार थोरात, जाधव यांनी केली आहे.

get_footer();