आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जय शिवराय प्रतिष्ठान कडून शिवराज्याभिषेक दिन साजरा

Spread the love

पवित्र नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ

बार्शी : अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षी देखील, जय शिवराय प्रतिष्ठान कडून अठरा पगड जाती व बारा बलुतेदार मावळ्यांकडून पवित्र नद्यांच्या पाण्याने छत्रपती शिवरायांना जलाभिषेक करण्यात आला.

आमदार राजेंद्र राऊत व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून जय शिवराय प्रतिष्ठान कडून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. मिठाई वाटप करून शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी आठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार समाजातील अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार राजाभाऊ राऊत व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
छत्रपती शिवरायांचा विचार समाजात रुजला पाहिजे आणि १८ पगड जाती १२ बलुतेदार यांना एकत्र करून ज्या पद्धतीने जय शिवराय प्रतिष्ठान काम करत आहे.

त्याच पद्धतीने समाजातील सर्व समाज बांधवांनी प्रत्येक गोष्टीमध्ये एकत्र आलं पाहिजे अशी भावना मान्यवरांनी व्यक्त करत जय शिवराय प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त व प्रा.किरण गाढवे, मधुकर डोईफोडे, वसंत हवालदार तसेच जय शिवराय प्रतिष्ठान सदस्य उपस्थित होते. शिव गर्जनेने वातावरण भरून गेले होते.

get_footer();