आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जरांगे पाटीलांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

बार्शी : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात व मराठा समाजाला त्यांचा हक्क व अधिकार मिळावा याकरिता बार्शी तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद यांनी आमरण उपोषण केले.

मराठा योद्धा जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावे याकरिता आमरण उपोषण करत आहेत त्यांना पाठिंबा देण्याकरिता व मराठा समाजाला त्यांचा ओबीसीचा हक्क अधिकार मिळावा याकरिता बार्शी तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद हे ५ जून पासून अमरण उपोषण करत आहेत” तरी लवकरात लवकर मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

get_footer();