आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जामखेड मध्ये महावीर जयंतीचे आयोजन

Spread the love

आचार्य श्री महाश्रमणजीचे सानिध्य : जैन समाजात उस्ताहाचे वातावरण

भुम : जामखेड शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २१ एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी होणार आहे. यावेळी तेरापंथ जैन समाजाचे आचार्य श्री महाश्रमणजी म. सा.यांचे सानिध्य मिळणार आहे. त्यामुळे जैन समाजात मोठे उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तेरापंथ धर्म संघ आचार्य प्रवर्तक युग प्रधान आचार्य श्री.महाश्रमणजी म. सा. सोबत अनेक जैन मुनींचे जामखेड मध्ये आगमन होणार आहे. जामखेड नगरीमध्ये हा सुवर्णयोग प्रथमच घडून येत आहे. यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यापासून जामखेड वर्धमान स्थानकवासी जैन समाज तयारीला लागला आहे. या कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणाहून जैन बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत.

get_footer();