आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जितो कार्निव्हलला अभूतपूर्व प्रतिसाद

Spread the love

जितो स्पोर्ट्स कार्निव्हलचीही झाली सांगता

पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन तर्फे “जितो स्पोर्ट्स कार्निव्हल” चे आयोजन करण्यात आले होते. ११ पेक्षा जास्त खेळ असलेल्या स्पर्धेची सांगता झाली. १७ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत रंगलेल्या स्पोर्ट्स कार्निव्हलमध्ये १५०० पेक्षा जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. जितो स्पोर्ट्स कार्निव्हलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दोन दिवस जितो कार्निव्हल फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे हे शहर सांस्कृतिक राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते. जितो स्पोर्ट्स कार्निवल आणि पूनावाला फिनकॉर्प यांच्या संयुक्त विद्यमाने या फेस्टिवलचे 16 आणि 17 मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते.

फेस्टिवल मध्ये मंडाला आर्ट, चित्रकला स्पर्धा, साहित्यिक प्रसार आणि जैन गोट टॅलेंट अशा या सर्व मनोरंजनाचा आस्वाद पुणेकरांना घेतला आणि तब्बल ११००० पेक्षा जास्त लोकांनी ह्या फेस्टिवलला भेट दिली. यावेळी येथे राजेशकुमार सांकला यांच्याकडून ४ सायकल तर रुपेश कोठारी यांच्याकडून १ ऍक्टिवा लकी ड्रॉ मार्फत लकी लोकांना भेट मिळाली.

जितो स्पोर्ट्स कार्निव्हलच्या अखेरच्या टप्प्यात रंगलेल्या सामन्यांनाही उस्फुर्त प्रतिसाद यावेळी मिळाला. फुल पिच टेनिस स्पर्धेत बीजेबी ब्लास्टर्स, मेन्स टर्फ क्रिकेटमध्ये बांठीया लिजेंड्स, लेडीज टर्फ क्रिकेटमध्ये ड्रेस इट अप क्वीन्स, व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये एस जे लोन्स, फुटबॉल मध्ये APPL या संघांनी विजेतेपद पटकावले. १७ फेब्रुवारी ते १७ मार्च असे एक महिना रंगलेल्या स्पर्धेची सांगता उत्साहात पार पडली.

खरं तर मोबाईलच्या दुनियेत मुलं सहसा बाहेर खेळायला जात नाही पण जितो स्पोर्ट्सने अजूनही मैदानी खेळ किती महत्त्वाचे आहे हे या स्पर्धेतून दाखवून दिले. शेवटी सर्व सहभागी आणि विजेत्या खेळाडूंचा सत्कार करत पुढच्या वर्षी यापेक्षाही मोठया प्रमाणात आयोजन केले जाईल असे मत जितो पुणेचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला यांनी व्यक्त केले.

कार्निव्हल यशस्वितेसाठी जितो पुणे चे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, जितो श्रमणआरोग्यम चे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जितो चे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, चेअरमन जितो स्पोर्ट्स विशाल चोरडिया, चेअरमन J POINT अजय मेहता, व्हाईस प्रेसीडेंट JATF इंदर जैन, DIRECTOR APEX अचल जैन, धीरज छाजेड, JATF चेअरमन ROM इंद्रकुमार छाजेड, चेअरमन ROM अजित सेठिया, जितो ROM व्हाएस चेअरमन पंकज कर्नावट, जितो पुणे व्हाएस चेअरमन मनोज छाजेड, अशोक हिंगड, नरेंद्र छाजेड, चीफ सेक्रेटरी चेतन भंडारी, सेक्रेटरी दिनेश ओसवाल, JT सेक्रेटरी संजय डागा, TREASURER किशोर ओसवाल, JT TREASURER दिलीप जैन, जीतो अॅपेक्स लेडीज विंग की अध्यक्षा संगीता लालवानी, लेडीज विंग अॅपेक्स प्रियांका परमार, खुशाली चोरडिया, जितो लेडीज विंग चेअरपर्सन लकीशा मर्लेचा, चीफ सेक्रेटरी मोना लोढा, जितो पुणे युथ विंग अध्यक्ष निकुंज ओसवाल, चीफ सेक्रेटरी सिद्धार्थ गुंदेचा, लक्ष्मिकांत खाबिया, संतोष जैन, जीनुभाई लोढा, कुणाल ओसवाल, दीपक जैन, अमोल कुचेरीया, सुनील जैन, सुरेश नाब्रिया, गिरीष जैन, संजय राठोड, मनोज तालेसरा, रिटा जैन, रुपाली भंडारी, अभिषेक जैन, जय ओसवाल, हीरेन भूमावत, अंकित लालवानी, संजना झाबक, कपिल राका, मिहिर शहा, शुभम राठोड, सिद्धांत संघवी, रक्षित मुथा, रोहित नवलाखा, सिद्धार्थ चुत्तर, प्रणव जैन, तन्वी भंडारी,प्रजीत ओसवाल, वैभव पटवा, आकाश नवलाखा, कोमल फिरोदिया यांनी प्रयत्न केले.

get_footer();