आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जितो स्पोर्टस् कार्निवलला शानदार सुरुवात

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), Other, People, Social, Sports • February 20, 2024
Spread the love

महिनाभर चालणार खेळांचा उत्सव

पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो ) तर्फे आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या अशा जितो स्पोर्ट्स कार्निवलला १७ फेब्रुवारी रोजी उत्साहात सुरुवात झाली.

तब्बल महिनाभर चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवामध्ये एकूण १० क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. पूनावाला फिनकॉर्प हे स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर्स असून मकवाना अँड तन्मय कंस्ट्रक्शन्स हे को-स्पॉन्सर्स आहेत. लॉन टेनिसची स्पर्धा हिराबाग व गंगाधाम चौकाजवळ, नाजूश्री मंगल कार्यालय परिसरात होणार आहे.

फ्यूचर स्पोर्ट्स अकॅडमी येथे बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि बुद्धिबळ या इनडोअर क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. टेबल टेनिसमध्ये महिला खुल्या गटात निकिता जैन, १८ वर्षाखालील पुरुष गटात जैनम शहा, १९ ते ३६ पुरुष गटात आयुष पालेशा, ३७ वर्षांहून अधिक पुरुष गटात सागर शहा, जैनम शहा आणि पुरुष दुहेरी गटात प्रशांत पोलाडिया हे विजेते ठरले आहेत.

३० वर्षाहून अधिक वयोगटात बुद्धिबळ स्पर्धेत गौरव बालकीवाल, महिला खुल्या गटात शार्वी बालकीवाल, पुरुष १५ ते ३० वयोगटात यश रुणवाल आणि १५ वर्षा खालील गटात कुशाग्र जैन हे विजेते ठरले आहेत. जितो स्पोर्ट्स कार्निवल हा अशा प्रकारचा पहिलाच सर्वात मोठा खेळांचा उत्सव आहे.

पुण्यात होत असलेल्या या स्पर्धेत पुण्यातील आणि देशातील खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेसाठी १२ फेब्रुवारी रोजी लिलाव करण्यात आले होते. १७ आणि १८ फेब्रुवारी दरम्यान इनडोअर क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. येत्या २६ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान टेनिस बॉल टूर्नामेंट होणार आहे. तर १४ ते १७ मार्च दरम्यान टर्फ स्पोर्ट्स होणार आहेत. १६ आणि १७ मार्च रोजी स्पोर्ट्स कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी जितो अॅपेक्सचे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, जितो श्रमण आरोग्यमचे उपाध्यक्ष विजय भंडारी, जितो स्पोर्ट्स अॅपेक्सचे अध्यक्ष विशाल चोरडिया, ROM चेअरमन अजित सेठिया, इंदर छाजेड, धीरज छाजेड, नरेंद्र छाजेड, संजय राठोड जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, जितो पुणे चॅप्टरचे मुख्य सचिव चेतन भंडारी, सचिव दिनेश ओस्तवाल, किशोर ओस्तवाल, संजय डागा, क्रीडा विभागाचे संचालक दिलीप जैन, क्रीडा संयोजक कुणाल ओस्तवाल, क्रीडाचे सह-संयोजक अमोल कुचेरिया, जीतो स्पोर्ट्स अॅपेक्सचे संयोजक दीपक जैन, जितो युथ विंगचे अध्यक्ष निकुंज ओसवाल, जितो युथ विंगचे मुख्य सचिव सिद्धार्थ गुंदेचा, लेडीज विंगच्या अध्यक्षा लकीशा मर्लेचा, लेडीज विंगच्या मुख्य सचिव मोना लोढा, क्रीडा संचालक यश ओसवाल, क्रीडा संयोजक आदित्य लोढा, क्रीडा सह-संयोजक आयुष पालेशा उपस्थित होते.

get_footer();