आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जैन मुनि डॉ. अजितचंद्र सागरजी महाराज यांनी रचला इतिहास

Spread the love

सहस्रवधन कथांची आठवण करून ६५० वर्षांनंतर केली इतिहासाची पुनरावृत्ती

मुंबई : जैन मुनि डॉ. अजितचंद्र सागरजी महाराज यांनी “सहस्रवधन “नावाचा एक उल्लेखनीय पराक्रम करून इतिहासात आपले नाव कोरले आहे, डॉ सागरजी महाराज यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी 1000 (सहस्रवधन ) गोष्टीच्या आठवणी सांगितल्या. डॉ सागरजी महाराज यांनी विलक्षण सिद्धी, ध्यान आणि एकाग्रता यांच्याद्वारे मानवी मनाच्या अमर्याद क्षमतेचे दर्शन घडविले.

डॉ. सागरजी महाराज यांचा शतावधान (100 गोष्टी लक्षात ठेवणे) पासून सुरू झालेला प्रवास द्विशतावधान (200), महाशतावधानामध्ये (500) प्रभुत्व मिळवून सहस्रवधन (1000 )च्या शिखरावर पोहचला. मुंबईतील वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात मनोरंजन, कायदे-न्यायालय, कॉर्पोरेट, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री मंगल प्रभात लोढा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी विशेष हजेरी लावली. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ताटेड यांनी डॉ. अजितचंद्र सागरजी महाराज यांना 1000 अवधान पूर्ण केल्यावर “सहस्रवधानी” ही पदवी बहाल केली, हा पराक्रम 650वर्षा पूर्वी झालेला होता.

आचार्य श्री नयचंद्र सागर सुरीश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सागरजी महाराज यांनी ऐतिहासिक सहस्रवधन-1000 अवधानाचा पल्ला गाठला. त्यांना लहानपणापासूनच विलक्षण स्मरणशक्तीची देणगी लाभलेली आहे.

राज्यातील शाळांमध्ये सरस्वती साधना सुरू करणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करताना म्हणाले, “सरस्वती साधनेच्या एका अद्भुत पराक्रमाचे आज आपण साक्षीदार आहोत. महाराष्ट्रात सहस्रवधाने आयोजित करून ते प्रेक्षकांसाठी थेट प्रस्तुत केल्याबद्दल मी मुनीजींचे कौतुक करतो. साधना ही सर्व क्षेत्रांसाठी महत्त्वाची आहे. आम्ही राज्यातील सर्व शाळांमध्ये लवकरच सरस्वती साधना सुरू करू जेणेकरून विद्यार्थ्यांना आपले ध्येय साध्य करून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळत राहील.

get_footer();