आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जैन सोशल ग्रुप पुणे आनंदच्या अध्यक्षपदी श्रीपाल ललवाणी यांची नियुक्ती

Spread the love

पुणे : जैन सोशल ग्रुप पुणे आनंदच्या नुकत्याच झालेल्या ७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल ललवाणी यांची सन २०२५ – २७ कालावधीसाठी अध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

यावेळी उपाध्यक्षपदी विलास पगारिया आणि सचिवपदी अजय ललवाणी यांची निवड करण्यात आली. खजिनदार म्हणून प्रवीण तालेडा तर सहसचिव म्हणून संजय कटारिया यांना तसेच दिलीपजी रायसोनी व अशोक बाफना यांना पी.आर.ओ. पदी नेमण्यात आले.

इतर कार्यकारणी मध्ये प्रकाश पगारिया, विजय पारख, डॉ. अशोक पगारिया, रमेश कटारिया, संजय मुथा, शोभा कांकरिया, ज्योती धोका, आणि मेघा कर्नावट यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे आय.डी. लालचंद जैन होते. त्यांनी शेर शायरीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ दिली. यावेळी जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन, झोन, आणि परिवारचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

दिलीप मेहता, मनेष शहा, दिलीप चोरबेले, राजेंद्र धोका, हसमुख जैन, अमोल झवेरी, चंचल कुचेरिया, आणि सुजश शहा यांनी “सर्वात जास्त कार्यक्रम देणारा ग्रुप” म्हणून जैन सोशल ग्रुप पुणे आनंदचे कौतुक केले आणि सर्व पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नूतन अध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांच्या मुलाने आणि सुनेने PPT द्वारे त्यांच्या ३० वर्षांच्या सामाजिक कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेंद्र बागमार यांनी ग्रुपचे व कार्यकारिणीचे कौतुक करताना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ता प्रा. अशोक पगारिया यांचा देखील सत्कार करण्यात आला. नूतन अध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांनी आपल्या मनोगतात परिवाराचे महत्त्व सांगितले आणि जास्तीत जास्त चांगले कार्यक्रम देण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाच्या दरम्यान मे महिन्यातील सदस्यांचे वाढदिवस, विवाह-बंध दिन साजरे करण्यात आले तसेच नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी लकी कूपन बक्षिसांची वाटप केल्यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

get_footer();