आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ज्येष्ठांनी संघटित व्हा आनंदात रहा – प्रविण चोरबेले

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), Other, People, Social • February 5, 2024
Spread the love

प्रेमनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या द्विदशकपूर्ती सोहळा

पुणे : ज्येष्ठांनी आता संघटित व्हावे एक दिलाने काम करावे आणि आनंदी रहावे असे मत नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी व्यक्त केले.

प्रेमनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या द्विदशकपूर्ती (वर्धापन दिनाच्या) निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने चोरबेले यांनी हे मत व्यक्त केले. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तेज निवळीकर, सिलाई वर्ल्डचे दादासाहेब गुजर,एसेकॉपचे मधुकर पवार,दिलीप पवार,श्रीराम बेडकीहाळ, मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठल कुलकर्णी हे उपस्थित होते
याप्रसंगी प्रवीण चोरबेले यांनी सांगितले की, जेष्ठांनी आता एकत्र येऊन संघटित राहण्याची गरज आहे. एकत्र असल्यामुळे आपल्याला आयुष्यातील सुख दुःखाची गोष्ट सांगता येते. वेळ जातो, मन हलके होते. नातवंडांना योग्य ते मार्गदर्शन करावे. त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आत्ताच्या पिढीला तुमची खूप मोठी गरज आहे असे मत चोरबेले यांनी व्यक्त केले.
यावेळी तेज निवळीकर यांनी सांगितले की, जेष्ठ झाले म्हणजे सर्व काही संपले असे नाही. निसर्गप्रमाणे आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी ज्येष्ठ व्हावे लागते ह्याच भान सर्वांना असणे गरजेचे आहे. स्वप्नाली शिंदे त्यांनी सांगितले की, ज्येष्ठांनी सावध राहण्याची गरज आहे ज्येष्ठाबरोबर फसवणुकीचे प्रकार वाढले आहे आपल्या वयाच्या हिशोबाने घरातल्यांचे सल्ले घ्या. सध्या सोशल मीडिया बॅकिंग च्या जाळ्यात जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात अडकत आहे.
या संबंधीत तक्रार असल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क करा असे मत व्यक्त केले. दादा गुजर यांनी सांगितले की, जेष्ठांची संघटना ह्या वयामध्ये सुद्धा तरुणांना लाजवणारे व अत्यंत जोमाने काम करत आहे.
प्रेमनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अगोदर गाण्याचा कार्यक्रम गायिका अनघा राजवाडे यांनी श्रीरामाची कथा कथन व श्रीराम भक्तीगीते सादर केली. दरवर्षीप्रमाणे मातृ-पितृ प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श माता पिता पुरस्कार देण्यात येतो यंदाच्या वर्षी हा पुरस्कार मुकुंद सांगलीकर व मृणाली सांगलीकर यांना देण्यात आला. ह्या प्रसंगी पाहुण्यांचा परिचय प्रकाश पोरवाल, अनंतराव चव्हाण ह्यांनी केले
ह्यावेळी नरेंद्र पवार,कार्तिक मिसाळ, मयूर कोठारी,अमित माशाळे हे मान्यवर व ज्येष्ठ नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर चौधरी यांनी केले व आभार प्रदर्शन सुनीता देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला.

get_footer();