आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने चोरणारा नोकर पकडला

Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

पुणे : दत्तनगर आंबेगाव येथील सोनाराच्या दुकानामध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यास अटक करुन त्यांच्या कडुन ५ लाख रुपयांचे ७ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१६ जुन रोजी दत्तनगर जांभुळवाडी रोड, गवळी वाडा, आंबेगाव खुर्द येथील सुमा आकांक्षा ज्वेलर्स दुकानातील सेल्समन विवेक वसंत दाभोळकर (वय ३१ रा. फ्लॅट नं.५, समर्थ अपार्टमेंट, जाधवनगर, रायकर मळा, धायरी, पुणे) याने दुकानातुन सोन्याचे दागिने चोरी केले म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणी सुमा आकांक्षा ज्वेलर्सचे मालक राहुल प्रकाश क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हयातील आरोपी विवेक दाभोळकर याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना सदरचा आरोपी हा धायरी रायकर मळा येथे थांबला आहे, अशी खात्रीशीर माहीती मिळाली.

त्यानुसार तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी धायरी, रायकर मळा, जाधवनगर येथे जावुन नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास अटक करुन त्याच्याकडुन ५ लाख रुपयांचे ७ तोळे वजानाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, नंदीनी वग्याणी, यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, निलेश जमदाडे, सतिश मोरे, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, विक्रम सावंत, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();