आवृत्ती पुणे
← Back to Homepage

टास्कच्या माध्यमातुन १९ लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : टास्कच्या माध्यमातुन विश्वास संपादन करुन जादा परतावा देण्याचे अमिष दाखवुन एका नागरिकाची १९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार कोथरूड २२ मे ते २८ मे दरम्यान कोथरूड येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखी तरुणाने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधला. अमेझॉन टास्कच्या माध्यमातुन टास्क पुर्ण करण्यास सांगुन त्यांचा विश्वास संपादन केला. ज्यादा परतावा देण्याचे अमिष दाखवुन फिर्यादी यांची १९,९१,४७२/- रुपयांची आर्थिक फसवणुक केली. कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंह कदम करीत आहेत.

get_footer();