आवृत्ती पुणे
← Back to Homepage

टिंगरेनगरला कारच्या धडकेने वृद्धाचा मृत्य

Spread the love

पुणे : भरधाव कारने धडक दिल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात टिंगरेनगर गल्ली नं.५ समई हॉटेलच्या गल्ली समोर विश्रांतवाडी एअरपोर्ट रोडवर १७ जुलै रोजी दुपारी घडला.

या प्रकरणी या नागरिकाचा मुलगा योगेश ढोली याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भर दिवसा हा अपघात झाला. मात्र चालक कार न थांबवता चालक पळून गेला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख तपास करीत आहेत. गेल्या दोन महिन्यात पुणे शहर परिसरात वाहनांचे धडक देऊन पळून जाण्याचे अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

get_footer();