आवृत्ती पुणे
← Back to Homepage

टेरेसवरील जुगार अड्यावर लोणीकंद पोलिसाचा छापा

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : टेरेसवरील जुगार अड्यावर छापा टाकुन लोणीकंद पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ०१ जुलै रोजी फडई चौक, इमारतीच्या टेरेसवरील खोलीमध्ये जुगार चालू असल्याची गोपनीय माहीती पोलिसांना मिळाली होती. तातडीने हालचाली करत लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी छापा टाकला.

इमारतीच्या टेरेस वर जुगार चालक व इतर ०४ जण हे १३ पत्ते रम्मी जुगार खेळताना मिळुन आल्याने त्यांच्याकडुन रोख रक्कम, चार चाकी वाहन, व जुगार खेळण्याचे साहीत्य असे एकुण ४,४३,८१०/- रु किंमतीचा मुददेमाल जागीच जप्त करण्यात आला.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४. विजयकुमार मगर, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर विठठल दबडे, लोणीकंद पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सावळाराम साळगावकर, तपास पथकाचे स. पो. नि. रविंद्र गोडसे, स. पो. नि. विजया वंजारी यांनी केली आहे.

get_footer();