आवृत्ती पुणे
← Back to Homepage

टोळीप्रमुख रब्बील शेख आणि साथीदारावर मोक्का

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, People, Police • February 7, 2024
Spread the love

खडकी पोलीसांची कारवाई

पुणे: टोळीप्रमुख रब्बील शेख व त्याच्या साथीदाराविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
खडकी पोलीसांनी ही कामगिरी केली.

रब्बील शेख, (वय ३२ वर्षे, रा. मेफेर एलिंगझा, कोंढवा), मुस्तफा खान, (वय १९ वर्षे, रा. रॉयल हाईट्स, बोपोडी) यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. फिर्यादी हे खडकी बाजार येथील एका कापड दुकानात सेल्समन म्हणुन नोकरी करतात. ते खडकी बाजार येथे असताना यातील आरोपी रब्बील शेख यांनी काही एक कारण नसताना फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यांना धमकाविले. फिर्यादीस दुकानातुन बाहेर ओढून पी.एम.पी. बस स्टॉपवर घेऊन येऊन, रब्बील शेख व त्याचा साथीदार मुस्तफा खान यांनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर दुखापत केली. त्याबाबत फिर्याद यांनी खडकी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.आरोपी रब्बील शेख यांने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. त्याने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिसांचाराचा वापर केला. हिसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपले बेकायदेशीर कृत्य चालु ठेवली. त्याने संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला आहे. त्याच्या विरुध्द पुणे शहरामध्ये खुनाचा प्रयत्न करणे व अन्य शरिराविरुध्दच्या गुन्ह्याची नोंद आहे. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग आरती बनसोडे या करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार), रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ४. विजयकुमार मगर, यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस उप निरीक्षक, अण्णा गुंजाळ, संतोष भांडवलकर, सर्वेलन्स पथकाचे पोलीस अंमलदार रमेश जाधव, महिला पोलीस अंमलदार स्वाती म्हस्के यांनी केली आहे. मोक्का अंतर्गत केलेली ही ११ वी कारवाई आहे.

get_footer();