आवृत्ती पुणे
← Back to Homepage

डिवाइन जैन ग्रुपचा 14 व्या वर्षात यशस्वी प्रवेश

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • August 3, 2024
Spread the love

पुणे : डिवाइन जैन ग्रुप हे पुण्यातील एक NGO आहे. ज्याच्या शाखा संपूर्ण भारतात आहेत व देशातील सर्व शाखातर्फे डिवाइन जैन ग्रुपचा 14 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्त पुण्यातील अंध मुलांसाठी होम फॉर दि ब्लाईंड बॉयज स्कूलमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मुलांच्या दुपारच्या जेवणाचा खर्च पुरवण्यात आला आणि फळे, बिस्किटे इत्यादींचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी संकेत शहा, प्रियांका शाह, पंकज साखरिया, अमित जंजानी, भूषण कर्णावट, हर्ष गुप्ता, अक्षय झावरे, पायल झावरे, चेतन जैन, तेजपाल ओसवाल, हर्षल नवलखा, गुंजन जैन, देवांग शाह, राही शहा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

डिवाइन जैन ग्रुपने पुढील वर्षभरात भारतभर विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमांमध्ये मोफत जेवण, मोफत कॅटरॅक्ट ऑपरेशन्स, रक्तदान शिबीर, अन्नधान्य वितरण, शाळांमध्ये संगणक व पुस्तके वाटप, सार्वजनिक स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, तसेच प्राण्यांची काळजी घेणे इत्यादींचा समावेश आहे.

get_footer();