आवृत्ती पुणे
← Back to Homepage

डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टतर्फे अनाथालय व वृद्धाश्रमात आंबेवाटप

Spread the love

पुणे : डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टतर्फे गुढीपाडवा आणि भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त अनाथालय व वृद्धाश्रम येथे आंबेवाटप करण्यात आले.

धर्मवीर शंभू अनाथालय आणि वृद्धाश्रम पासुन या वर्षी सुरुवात करण्यात आली. या वेळी संकेत शहा, हार्दिक शहा, प्रियांका शहा, करण शहा, भूषण कर्नावट, तनिश जैन, कियान कर्नावट, सोनिया कर्नावट, तेजल शहा, निशिल शहा व समय चौधरी उपस्थित होते.

डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टच्या वतीने पुणे, कराड, कोल्हापूर उस्मानाबाद, अहमदाबाद, उदयपूर, शंकेश्वर व जुनागड येथील शाखा असलेल्या विविध शहरांमध्ये 9 ते 25 एप्रिल या कालावधीत अनाथालय व वृद्धाश्रम येथे आंब्याचे वाटप केले जाईल असे डिवाईन जैन गृपचे अध्यक्ष संकेत शहा यांनी सांगितले.

get_footer();