आवृत्ती पुणे
← Back to Homepage

डोक्यात रॉड मारून रामटेकडीतील युवकाचा खुन

Spread the love

पुणे : खोटया केसमध्ये अडकवल्याचा राग मनात धरून दोघांनी रामटेकडी येथील एका तरुणाचा डोक्यात रॉड मारून खून केल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात मयताच्या भावाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ फरहान अब्दुल रज्जाक शेख (वय ३३ वर्ष रा. रामटेकडी, पुणे) याने दोघांना खोटया केस मध्ये अडकवल्याचा राग होता. त्यांनी शुक्रवारी रात्री त्याच्या डोक्यात रॉड मारुन रामटेकडी ब्रिजजवळ रेल्वे पटरीवर त्याचा खुन केला. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश गिते करीत आहेत.

get_footer();