आवृत्ती पुणे
← Back to Homepage

डोळ्यात मिरची पूड टाकून महिलेस मारहाण

Spread the love

पुणे : समाजकल्याण कार्यालयातुन मिळणाऱ्या आर्थिक मदतीस विरोध केल्याने तिघांनी महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिला मारहाण केल्याची घटना धानोरीत घडली आहे. साई धाम सोसायटी लोहगाव येथील एका महिलेने या बाबत तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला २१ जुलै रोजी मुलासोबत मच्छि मार्केट रोड जवळील पाण्याच्या टाकीजवळ पायी चालत होती.

त्यावेळी एकाने अडवुन समाजकल्याण कार्यालयातुन तिला मिळणाऱ्या आर्थिक मदतीस विरोध केल्याचा राग मनात धरुन तुला सोडणार नाही असे बोलुन फिर्यादीच्या डोळयात मिरची पावडर टाकली व सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने डाव्या हातावर व पाठीवर वार करुन फिर्यादीस गंभीर जखमी केले. या गुन्ह्याची नोंद विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

get_footer();