आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तडीपार गुंड दाद्या शिंदे जेरबंद, दोन वर्षासाठी केले तडीपार

Spread the love

युनिट ५ गुन्हे शाखेची कामगिरी

पुणे : तडीपार गुंड आदित्य उर्फ दाद्या शिंदे याला जेरबंद करण्यात युनिट ५ गुन्हे शाखेला यश आले आहे. त्याला पुणे शहर व पुणे जिल्हयातून २ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.

आदित्य उर्फ दाद्या शिंदे, (वय-२४ वर्षे, रा. कामठेवस्ती, माळवाडी हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे युनिट ५ कार्यक्षेत्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारांकडुन कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी युनिट ५, चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी युनिटकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टिम तयार करुन त्यांना योग्य ती कारवाई करण्यासाठी सुचना दिल्या होत्या.

युनिटकडील पोलीस अंमलदार अकबर शेख यांना माहिती मिळाली की, पुणे शहर व पुणे जिल्हयातुन तडीपार केलेला गुंड आदित्य उर्फ दाद्या शिंदे याच्याकडे धारदार शस्त्र असुन तो कोणता तरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने माळवाडी, हडपसर या परिसरात वावरत आहे अशी माहिती मिळाली.

तडीपार आरोपी आदित्य उर्फ दाद्या शिंदे याला पकडण्यासाठी सापळा लावून त्याला शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. अधिक तपास चालु आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त, गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विनोद शिवले, दया शेगर, शशिकांत नाळे, दाऊद सय्यद, पांडुरंग कांबळे, राहुल ढमढेरे यांनी केलेली आहे.

get_footer();