आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तरुणाच्या गळ्यावर वार करणाऱ्या दोघांना अटक

Spread the love

पुणे : मोटार सायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याचा दुसरा साथीदार असलेल्या आरोपीलाही मुंबईत अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारदि.२१ जुलै रोजी नवाजीश चौक येथील हयात हॉटेल शेजारी फिर्यादी हे त्यांचे नातेवाईकांना रिक्षामध्ये बसवित होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तीन अनोळखी युवकांचा त्यांना धक्का लागला होता. तेव्हा फिर्यादी यांनी त्यास गाडी नीट चालविता येत नाही का असे विचारले असता त्यांच्यामध्ये वाद झाला.

दुचाकी गाडीवरील सोहल जावेद शेख उर्फ सोहेल शुटर (वय २१ वर्षे रा. शिवनेरी नगर कोंढवा पुणे) याने फिर्यादी यांचा पाठलाग करून त्याच्याकडील धारदार हत्याराने त्यांच्या गळ्यावर वार करून त्यांना गंभिर जखमी केले. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीच्या शोधात पोलीस होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार संतोष बनसुडे व ज्ञानेश्वर भोसले यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी सोहल जावेद शेख उर्फ सोहेल शुटर हा पारसी मैदान येथे थांबलेला आहे.

तपास पथकाने तातडीने तेथे जात आरोपी यास पारसी मैदान येथून ताब्यात घेवून अटक केली आहे. आरोपीच्या पोलीस कस्टडी दरम्यान सदरचा गुन्हा त्याने त्याचा साथीदार फैज अकबर खान (वय २४ रा. टिटवाळा मुंबई) याच्यासह केल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपी यास सुद्धा तपास पथकाने टिटवाळा, मुंबई येथून ताब्यात घेवून त्यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक केली आहे.

ही कारवाई ही पोलीस उप-आयुक्त आर. राजा, सहा. पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, व पोलीस निरीक्षकगुन्हे), रूणाल मुल्ला, यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, शाहिद शेख, ज्ञानेश्वर भोसले, सुजित मदन, सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();