आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तुळापुर व भावडीतील गावठी हातभट्टी दारु विक्रेत्यांवर छापा

Spread the love

पुणे : लोणीकंद पोलिसांनी तुळापुर व भावडी परिसरातील गावठी हातभट्टी दारु विक्रेत्यांवर छापा टाकून साडेतीन लाखाचे दारू बनवण्याचे साहित्य नष्ठ केले आहे. दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारुचे अवैध धंदे चालू असल्याची महिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार रविवारी (दि.२८) लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांचे नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे व पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल यांच्या दोन टिमने ही कारवाई केली.

भावडी गावच्या हद्दीत गट नंबर २६५ येथील कैलास हांडगर यांच्या शेतालगत अर्धवट बांधकाम असलेल्या घराच्या जागेत चालु असलेल्या हातभट्टीवर कारवाई करून एकूण ३,७२,०००/- रुपये किंमतीचे गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, तयार दारु व इतर साहित्य नष्ट केले.

मंदाबाई जंगलु गुडावत (रा. ५ नंबर, भावडी रोड, ता. हवेली) हिच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच तुळापर, नागरमल वस्ती या ठिकाणी हिराबाई कांताराम भिडे, ईश्वर नामदेव जठार यांच्या विरुध्द कायदेशिर कारवाई करुन त्याच्या ताब्यातुन एकुण १५००/- रुपये किंमतीची हातभट्टीची गावठी तयार दारु नष्ट करुन त्यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, परि. ४, पुणे शहर, विजयकुमार मगर, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याच्या, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), निलेश जगदाळे, तपास पथकाचे स.पो.नि. रविंद्र गोडसे, पो. उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार विनायक साळवे, कैलास साळुंके, सागर जगताप, अमोल डोणे, साईनाथ रोकडे, शुभम चिनके, परमेश्वर आघाव, महिला पोलीस अंमलदार राणी मोटे, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.

get_footer();