आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दत्तनगर सराफाच्या दागिन्यांची चोरी

Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांनी सेल्समनला केली अटक

पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील आंबेगाव दत्तनगर येथील सराफांच्या दुकानातील दागिन्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून भारती विद्यापीठ पोलीसांनी सेल्समनला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १६ जून रोजी सायंकाळी पावणेपाच ते सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी सुमा आकांक्षा ज्वेलर्स चे मालक राहुल प्रकाश क्षीरसागर यांच्या दुकानात हा सेल्समन काम करीत होता.सायंकाळी तो ५ लाख ८६ हजाराचे सोन्याचे दागिने घेऊन गेला आहे.

सराफाने अखेर वाट पाहून भारती विद्यापीठ पोलिसात तकर दाखल केली आहे. या प्रकरणी विवेक वसंत दाभोलकर (रा.रायकर नगर धायरी) यास अटक केली असल्याची माहिती पोलिस उप निरीक्षक धीरज गुप्ता यांनी दिली.

get_footer();