आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या टोळीला भारती विदियापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कात्रज परिसरातील जैन आगम मंदिर परिसरातील एक अर्धवट काम झालेल्या इमारतीत जमलेल्या या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्यातील एक जन पळून गेला आहे. त्यांच्याकडे तलवारीसारखी धारदार शस्त्रे मिळून आली आहेत गुरुवारी रात्री पोलिसांनी त्यांना पकडले. या प्रकरणी नामदेव रेणुसे सहा. पोलीस फौजदार यांनी फिर्याद दिली आहे.

पवन रविंद्र महादेवकोळी (वय २३ रा. म्हस्के चाळ, जैन मंदिर, कात्रज, पुणे, योगेश अनिल शिंदे, (वय १९ वर्षे, रा.मु.पो. डॉजा, ता. परंडा, जि. धाराधिव, भालचंद्र रविंद्र महादेवकोळी (वय १९) यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

get_footer();