आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दहशत पसरवणाऱ्या ओंकार उभे या वर स्थानबध्दतेची कारवाई

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police • January 22, 2024
Spread the love

पी.सी.बी. गुन्हे शाखेचा दणका

पुणे:- हडपसर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, ओंकार उभे या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

ओंकार उभे, (वय २२ वर्षे, रा. स.नं. १६५, केशव चौक, माळवाडी, हडपसर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, पालघन, हॉकी स्टीक या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, बलात्कार, अपहरण, दरोडा, गंभीर दुखापत, साधी दुखापत, घरा विषयी आगळीक, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याच्याविरूध्द ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
स्थानबध्दतेची ही ८९ कारवाई आहे.

get_footer();