आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दारूचे पैसे न दिल्याने कारचे केले नुकसान

Spread the love

पुणे : दारूचे पैसे न दिल्याचा राग आल्याने एका मद्यपीने कार चालकाचा मोबाईल व रोकड जबरदस्तीने काढून घेतला व त्याच्या कारचेही नुकसान केल्याचा प्रकार वडगाव शेरी भागात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना. तेजस वाईन शॉप सोमनाथ नगर वडगांव शेरी येथे घडली. फिर्यादी हे शोप मधून दारू विकत घेत असताना चार इसमांनी फिर्यादीस वय कमी असल्याने त्याचे कडील एटीएम कार्ड देवुन वाईन शॉपमधुन दारू विकत घेण्यास सांगितली.

त्यास फिर्यादी यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांनी फिर्यादीला मारहाण करून कार मधील मोबाईल व रोख ५,३५,०००/-रु.चा ऐवज जबरी चोरी करून गेले व जाता जाता फिर्यादीच्या कारचे नुकसान केले. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने व हवालदार सचिन कळसाइत यांनी तातडीने हालचाल करीत त्यातील एक आरोपी निखिल दरेकर याला ताब्यात घेतले आहे.

get_footer();