आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दारूच्या पैशासाठी तरुणास कोयत्याच्या धाकाने लुटले

Spread the love

पुणे : दारूसाठी पैशांची मागणी करून सराईत गुन्हेगाराने साथीदाराच्या मदतीने एका तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी आणि रोख रक्कम जबरदस्ती काढून घेतल्याची घटना स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

या प्रकरणी भीमराव मानपाडे (वय २३, रा. धनकवडी) याने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमन शाकीर शेख (वय १९, रा. गुलटेकडी) आणि अन्य एकावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शेख हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

हा प्रकार १३ जुलैला मध्यरात्री घडला आहे. मात्र, तक्रारदाराने भीतीपोटी तक्रार दिली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कटारिया शाळेसमोरील मीनाताई ठाकरे वसाहतीच्या कमानीतून पायी जात होता.
त्यावेळी तक्रारदाराच्या ओळखीचा आरोपी तेथे आला. त्याने तक्रारदाराकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले, मात्र तक्रारदाराने आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तक्रारदाराला कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ आणि मारहाण केली.

आरोपींनी तक्रारदाराच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि खिशातून १४ हजार ५०० रुपये जबरदस्ती काढून घेतले. दरम्यान, तक्रारदार मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत असताना आरोपीने कोयत्याने मोबाइलवर मारले. यावेळी तक्रारदाराने आरडा ओरडा केला. तेव्हा आसपासचे काही लोक मदतीसाठी धावून आले. आरोपींनी त्यांनाही धमकावले व तेथून पळ काढला.

get_footer();