आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दारूला पैसे न दिल्याने गुंडांचा धुडगूस

maharashtra jain warta • Breaking News, Maharashtra News Networks, News, News Slider, Other, People, Police • June 9, 2025
Spread the love

पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे गुंडांच्या टोळक्याने टेम्पोची काच फोडून चालकाला मारहाण केली व त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. याचा जाब विचारल्यावर टेम्पो मालक व त्यांच्या मुलगा, भाचा यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. त्यांच्या खिशातील रोकड, सोन्याची साखळी, मोबाईल असा ऐवजही जबरदस्तीने घेतला. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून पाच गुंडांना अटक केली आहे.

याबाबत रफिक मोहम्मद मणियार (वय ५४, रा. सुरभी कॉलनी, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आशितोष नारायण साठे (वय २२, रा. कुळे, ता. मुळशी), ओम सचिन वनकुद्रे (वय १९, रा. गृहलक्ष्मी अपार्टमेंट, तपोधाम सोसायटी, वारजे), सुमित दीपक तावडे (वय २०, रा. दांगट पाटीनगर, वारजे), वेदांत राजेंद्र भास्कर (वय २४, रा. दांगट अपार्टमेंट, नर्‍हे), पॉलजेरॉल्ड फर्नाडिस (वय २९, रा. पवार बिल्डिंग, वारजे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मणियार यांचे भंगाराचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातील कामगार गोविंदकुमार हा टेम्पो घेऊन घरी जात होता. त्यावेळी रस्त्यात आरोपींनी त्याला अडवले व दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली.

त्याने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी टेम्पोची काच दगडाने फोडली व त्याला बाहेर ओढून हाताने मारहाण केली. त्याच्या खिशातील २०० रुपये जबरदस्तीने घेतले. ही माहिती गोविंदकुमारने मालक मणियार यांना दिली.

मणियार, त्यांचे मुलगे शाहिद, अमन व भाचा राहिल मणियार तेथे पोहोचले. त्यांनी आरोपींना “गाडीची काच का फोडली?” असे विचारल्यावर आरोपींनी शाहिदच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला जखमी केले.

राहिललाही मारहाण केली. त्यानंतर दोघांनी रफिक मणियार यांना पकडून धाक दाखवून त्यांच्या खिशातील ५०० रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. तसेच शाहिदच्या गळ्यातील सोन्याची साखळी असा एकूण ४५,७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

त्यातील एका गुंडाने “मी आशितोष साठे — या भागातील भाई आहे. तुला इथे धंदा करायचा असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल,” असे म्हणून हत्यार हवेत फिरवले. तसेच “आम्ही इथले भाई आहोत, आमच्यात कोणी आला तर एकेकाला खल्लास करून टाकीन,” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे करत आहेत.

get_footer();