आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

पुणे : दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी प्रदान करण्यात येणारे प्रतिष्ठेचे “आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार” यंदासाठी जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे हे ३१ वे वर्ष असून मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार नागपूर येथील जस्ट युनिव्हर्सल प्रा. लि. चे संचालक उज्वल पारसमलजी पगारिया यांना जाहीर करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी पुणे येथील चितळे उद्योग समूहाचे संचालक संजय उर्फ गोविंद नरसिंह चितळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच पुणे शहरस्तरीय पुरस्कारासाठी रेनबो हाऊसिंगचे सुनिल पोपटलाल नहार यांची निवड करण्यात आली आहे.

चेंबरच्या सभासदांमधून दिला जाणारा विशेष पुरस्कार मे. नवीन पेढीचे संस्थापक मा. जयभगवान गोवर्धन गोयल यांना जाहीर करण्यात आला आहे. युवा व्यापारी पुरस्कार मे. वीरल इंटरनॅशनलचे संचालक मा. वीरल रमेशभाई पटेल यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच कै. वीरेन गवाडिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार दै. लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार राहुल खळदकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यावेळी विशेष अतिथी म्हणून सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, शहर विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे उपस्थित राहणार असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, प्रविण चोरबेले, नवीन गोयल, दिनेश मेहता, उत्तम बाठिया तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

get_footer();