आवृत्ती पुणे

राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

निखिल पिंगळे साताऱ्याचे तर, राजकुमार शिंदे वाशिमचे पोलीस अधीक्षक महाराष्ट्र न्युज नेटवर्क

लाच घेणाऱ्या शिरूर तहसीलमधील दोघांना अटक

लाच घेताना कंत्राटी कामगारासह खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जमिनीच्या सातबारा व फेरफारच्या नकला देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या शिरूर तहसील कार्यालयातील कंत्राटी कामगारासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. कंत्राटी कामगार सुरज शरद थोरात (वय ३४, रा. नवोदय कॉलनी, कडेगाव, अहिल्यानगर) आणि खासगी व्यक्ती महेश … Read more

दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी प्रदान करण्यात येणारे प्रतिष्ठेचे “आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार” यंदासाठी जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे हे ३१ वे वर्ष असून मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार नागपूर येथील जस्ट युनिव्हर्सल प्रा. लि. … Read more

गांजा बाळगणारा रिक्षाचालक अटकेत

वाघोली पोलिसांनी रिक्षासह २ लाखांचा माल केला जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करणाऱ्या वाघोली पोलिसांनी संशयास्पदरीत्या थांबलेल्या चालकाच्या रिक्षाची झडती घेतली असता त्यात गांजा आढळून आला. पोलिसांनी रिक्षासह २ लाख १६ हजार ६८० रुपयांचा माल जप्त केला आहे. मोहम्मद जिशान अकबर अली अन्सारी (वय २८, सध्या रा. भावडी रस्ता, वाघोली; … Read more

पत्नीच्या तोंडावर ब्लँकेट दाबून केला खुन

खडकी पोलिसांनी पतीला केली अटक, घटस्फोटीत पत्नीला भेटत असल्याचा संशयावरुन भांडणे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घटस्फोट झाला असताना पहिल्या पत्नीला भेटत असल्याच्या संशयावरुन दुसरी पत्नी भांडत असते. या भांडणाला कंटाळून पत्नी झोपली असताना तिच्या तोंडावर गळ्यावर ब्लँकेट दाबून तिचा खुन केल्याच्या प्रकार समोर आला आहे. रात्री ११ वाजता पत्नीचा खुन केल्यानंतर पती रात्रभर तिच्या … Read more

भुम नगर परिषदेच्या नवीन सक्शन टँकरचे नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते पूजन

शहर स्वच्छतेसाठी महाराष्ट्र शासनाकडून सक्शन टँकर उपलब्ध : नागरिकांसाठी मोठी सुविधा महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : भुम शहराच्या स्वच्छता व्यवस्थेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सक्शन टँकर (मलनिसारण गाडी)चे नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. शहरातील स्वच्छता व मलनिसारण व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून भुम नगर परिषदेस नवीन सक्शन … Read more

गावठी दारू विक्रेत्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रस्तावावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आदेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पाषाण येथील लमाण तांडा व परिसरात बेकायदा गावठी दारू तयार करून विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याला एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला … Read more

बिगुल वाजला : भूममध्ये सत्तेचा ‘महासंग्राम’ सुरू!

५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी : १२४ मतदान केंद्रांवर १.०२ लाख मतदारांचा सहभाग भूम : भूम तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, जिल्हा परिषदेच्या पाच गटांसाठी आणि पंचायत समितीच्या दहा गणांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेवैय्या डोंगरे यांनी तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाला लुटले

कात्रज–कोंढवा रोडवरील भरदिवसाची घटना : ९० हजारांचे दागिने घेऊन गेले पळून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून तिघा चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला अंगावरील दागिने काढण्यास सांगितले. सोनसाखळी व अंगठी रुमालात बांधून देण्याचे नाटक करून ते दागिने घेऊन मोटारसायकलवरून पळून गेले. याबाबत माऊलीनगर येथे राहणाऱ्या ६३ वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात … Read more