आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘दृष्यम’ स्टाईलने बनाव करुन केला खून

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police, Social • January 16, 2024
Spread the love

लोणीकंद पोलीसांनी गुन्हयाची केली उकल

पुणे : दृष्यम” सिनेमाप्रमाणे नवऱ्याने स्वतःवर संशयाची सुई येऊ न देत पुरेपुर खबरदारी त्याने घेत पत्नीचा खून केला. मिसींग झाल्याचा बनाव करुन खुन केलेल्या गुन्हयाची उकल करण्यात लोणीकंद पोलीसांना यश आले आहे.

अमोलसिंग जाधव (वय २६ वर्षे, रा. भैरवनाथ मंदीराजवळ, महेश गोरे यांचे भाडयाचे खोलीत फुलगाव ता. हवेली जि. पुणे. मुळ रा. मु.पो. अंजिनाईक ता. अरणी जि. यवतमाळ तसेच घर नं. ४/५ ४७६, गायत्री मंदीर नवीन पुल नांदेड) असे गुन्हेगाराचे नाव आहे.
३८ वर्षीय महिला मिसींग झाली होती. तिचा पती अमोलसिंग जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाणे या ठिकाणी मनुष्य मिसीग दाखल करण्यात आली होती. मिसींगचा तपास पोलीस अंमलदार प्रकाश आव्हाळे यांचेकडे होता.
मिसींग दाखल झाल्यापासुन तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक, रविंद्र गोडसे हे त्यांना मार्गदर्शन करीत होते. तपासादरम्यान आरोपी अमोलसिंग मुरली जाधव याने त्याच्या नातेवाईकांची नावे पोलीसांना पुरविली व स्वतःही मिसींगच्या तपासकामी मदत केली. काही ठिकाणी तो स्वतःच पोलीसांसोबत पत्नीचा शोध घेण्यासाठी गेला. आरोपी हा इंन्द्रो प्रा. लि. मरकळ पुणे या कंपनीमध्ये मजुरी काम करीत होता. त्याची पत्नी गृहीणी होती. मिसींग दाखल केल्याच्या दिवशी तो दिवसभर कामावर हजर असल्याचे तो काम करीत असलेल्या कंपनीत गेटवर केलेल्या नोंदीवरुन समोर आले. त्याने स्वतःचा मोबाईलही १५ दिवसापासुन बंद असल्याचे सांगितले. “मिसींग महिलेचा शोध घेण्याचे पोलिसांचे सर्व प्रयत्न फोल ठरत होते. त्यामुळे पती अमोलसिंग जाधव यालाच वारंवार तपासकामी बोलाविले गेले. प्रत्येक वेळी तपासामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये थोडी थोडी विसंगती येत असल्याचे निर्दशनास येऊ लागले. तसेच त्याच्या चेहऱ्यावरील भाव हे पुर्णपणे नैसर्गिक नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्यावरील संशय वाढतच गेला. अखेरीस सहायक पोलिस निरिक्षक गोडसे व पोलीस अंमलदार प्रकाश आव्हाळे यांनी विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या चौकशीदरम्यान त्याने २८ ऑक्टोबर रोजी वाई सातारा जवळील मांढरदेवी घाटात पत्नीची गळा दाबुन हत्या केल्याची व तिचे प्रेत दरीत ढकलुन दिल्याची कबुली दिली. त्यावर लगेचच पोलीस उप निरीक्षक रेशीम कोळेकर, पोलीस अंमलदार स्वप्निल जाधव, अजित फरांदे यांचे एक पथक तयार करण्यात आले. व ते मांढरदेवी देवस्थान, वाई या ठिकाणी रवाना करण्यात आले. या पथकाने मांढरदेवी देवस्थान, वाई घाटात सुमारे २०० ते २५० फुट खोल दरीत उतरुन कसोशीने शोध घेतला. अथक प्रयत्न केल्यावर सुमारे अडीच महीन्यापुर्वी मृत्यु झाला असल्याने त्यांना मिसींग महिलेचा केवळ सांगाडा तिची चप्पल, साडी व बांगडया मिळुन आल्या. मयत महिलेच्या सांगाडयाचे ससुन हॉस्पीटल, पुणे या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले आहे. पोलीस अंमलदार प्रकाश आव्हाळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असुन या गुन्हयात आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पत्नी आपल्यापेक्षा बारा वर्षांनी मोठी आहे, आपली इच्छा नसतानाही पालकांनी आपले तिच्याशी लग्न लावुन दिले आहे, तसेच ती थोडी मंदबुध्दी आहे. त्यामुळे आरोपीने तिला घटस्फोट देण्याचा प्रयत्न केला परंतु तिने त्याला नकार दिल्याने अमोलने तिचा कायमचा काटा काढायचे ठरवले व अत्यंत थंड डोक्याने व नियोजनबध्द पध्दतीने तिचा खुन केला. परंतु अडीच महिन्यानंतर का होईना कायदयाचे हात त्याच्यापर्यंत पोहचले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४ विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

get_footer();