आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नफ्याचे आमिष दाखवून दहा लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून दहा लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार वारजे माळवाडी हद्दीत घडला आहे.

या प्रकरणी एका २५ वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २८ मे ते २४ जून या काळात घडली आहे. एका तरुणाने फिर्यादी महिलेशी संपर्क साधला व गुंतवणुकीतून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडले. मात्र जादा परतावा किंवा नफा न देता त्यांची १०,१३,०००/- रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिस निरीक्षक मनोज शेंडगे तपास करीत आहेत.

get_footer();