आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नफ्याचे आमिष दाखवून वाघोलीत दोघाना फसवले

Spread the love

पुणे : ऑनलाईन माध्यमाव्दारे अनोळखी इसमांनी व्हॉटसअप ग्रुपला जॉईन करुन विश्वास संपादन करुन अधिक मोबादला देतो असे आमिष दाखवुन, वेगवेगळे शेअर्स जबरदस्तीने विकत घ्यायला लावुन दोघांची ३१ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार लोणीकंद वाघोली परिसरात घडला आहे.

हा प्रकार २७ एप्रिल टे २२ मे या कालावधीत घडला. या प्रकरणी वाघोलीतील दोघाजणांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अनोळखी ने त्यांच्याशी संपर्क साधला. व्हॉटसअप ग्रुपला जॉईन करुन त्यावर लिंक पाठवुन ट्रेडिंग अकाउंट उघडण्यास सांगुन ट्रेडिंग बाबत माहिती देवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.

अधिक मोबादला देतो असे आमिष दाखवुन, वेगवेगळे शेअर्स जबरदस्तीने विकत घ्यायला लावले. फिर्यादी यांची १७,४३,०००/- रु.ची त्यांच्या साथीदाराचीयांची १४,३४,०००/- आर्थिक फसवणुक केली. वरीष्ठ पोलीस निरीक्षक. सावळाराम साळगावकर. तपास करीत आहेत.

get_footer();