आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नफ्याचे आमिष दाखवून १४ लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : शेअरमध्ये गुंतवणुकीतून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून १४,९०,०००/- रु.ची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमान नगर येथे राहणाऱ्या फिर्यादी यांना ऑनलाईन माध्यमाव्दारे अनोळखी मोबाईल धारकाने संपर्क साधला. त्यांना वेगवेगळ्या शेअर्स व आयपीओ मध्ये गुंतवणुक करून चांगला मोबदला मिळण्याचे आमिष देवुन बैंक खात्यावर पैसे भरावयास सांगितले.

दरम्यान प्रथम ५०,०००/- रू मोबदला देवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. व फिर्यादी यांना १४,९०,०००/- रु. भरावयास सांगुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुमार करीत आहेत.

get_footer();