नफ्याच्या आमिषाने ३५ लाखाचा गंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : फिर्यादीला २० टक्के नफा मिळेल असे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडून ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार कॅम्प परिसरात घडला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना यातील अनोळखी इसमांनी ऑनलाईन माध्यमाव्दारे गुंतवणुक करण्यास भाग पाडुन गुंतवणुकीतुन २० टक्के मोबदला देतो असे आमिष दाखवुन फिर्यादी यांची एकुण ३५,०५,०९५/- रुपये भरावयास भाग पाडुन फसवणुक केली आहे.
सप्टेंबर २३ ते मार्च २४ या काळात हा प्रकार घडला. वाट पाहूनही नफा न मिळाल्याने त्यांनी लष्कर पोलीसात तक्रार दाखल केली आहे. माहिती व तंत्रज्ञान कायदा अंतर्गत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
