आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्कुबा डायव्हिंग जगभरात व्हायरल

Spread the love

गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमधील पंचकुई सागरकिनाऱ्यालगत ‘स्कूबा डायव्हिंग’चा आनंद घेतला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या जगभरात व्हायरल झाले आहेत. पांढरे ‘डायव्हिंग हेल्मेट’ आणि भगवे वस्त्र परिधान केलेल्या नौदलाच्या पाणबुड्या जवानांच्या मदतीने सागरी पृष्ठभागी प्रार्थनेसाठी हात जोडून, मांडी घालत भगवान कृष्णाला मोराची पिसे अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.

या अनुभवाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, खोल समुद्रातील प्राचीन द्वारकेचे दर्शन घेणे हा आपल्यासाठी अत्यंत दिव्य अनुभव होता. यामागे माझ्या धाडसापेक्षाही श्रद्धेचा भाग जास्त होता.

जेव्हा आपण या प्राचीन शहराच्या अवशेषांना स्पर्श करत होतो, तेव्हा २१ व्या शतकातील भव्य भारताचे चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर तरळले आणि मी बराच काळ पाण्याखाली रेंगाळलो. सागरातील द्वारकेच्या दर्शनाने विकसित भारताचा माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे’’.

द्वारका येथे अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मोदींच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. ‘‘देशाऐवजी एकाच कुटुंबाची प्रगती कशी होईल, यावरच काँग्रेस आपली सर्व शक्ती खर्च करत आहे,’’ असेही ते म्हणाले.

ओखा आणि द्वारकेला जोडणाऱ्या देशातील सर्वाधिक लांबीच्या केबल पुलाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोदी म्हणाले, की सर्व घोटाळे संपुष्टात आणण्याच्या आपल्या सरकारच्या कटिबद्धतेमुळेच आता देशाची प्रगती झाली आहे आणि बेट द्वारका आणि मुख्य भूमी ओखा यांना जोडणाऱ्या सर्वात लांब ‘सुदर्शन सेतू’सारख्या केबल पुलाच्या रुपाने भव्य पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णानेच आपल्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

get_footer();