आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पतीच्या त्रासाला कंटाळुन महिलेची आत्महत्या

Spread the love

पुणे : पती नेहमीच त्रास देतो, चारित्र्यावर संशय घेतो, त्यामुळे होत असलेल्या रोजच्या भांडणाला कंटाळून एका ३३ वर्षीय महिलेने २२ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली आहे.

पुजा विकी कांबळे, (वय ३३ वर्ष, रा. बोलाई खाना, नरपतगिरी चौक, पुणे) असे तिचे नाव आहे. तिच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. तिचा पती असुन तो नेहमी तिचे चारित्र्यावर संशय घेवुन तिला शिवीगाळ करुन भांडणे करीत होता.

त्याच्या या त्रासाला कंटाळुन घरातील स्वयंपाकाचा चाकु स्वतःच्या पोटात मारुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे तक्रारीत म्हटले आहे. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड करीत आहेत.

get_footer();