आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पर्वती पायथा परिसरात गावठी पिस्तुल जप्त

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : पर्वती पायथा परिसरात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाकडून देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अधिकारी सचिन पवार व स्टाफ गस्त घालत असतांना पथकातील पोलीस अंमलदार अमोल दबडे व अमित चिव्हे यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पर्वती पायथा कमानीच्या जवळ रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे पिस्टल असुन तो कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे.

पोलिसांनी तपास पथकाची टीम तयार करुन बातमीच्या ठिकाणी सापळा रचुन एका विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेतले. त्याच्याकडुन ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०१ जीवंत काडतुस ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याने त्याचा साथीदार अमन अंबीर झारेकरी(वय २० वर्षे, रा. महालक्ष्मी बिल्डींग, दांडेकर पुल) याने सदरचे पिस्टल ठेवण्यास दिल्याचे सांगितले. त्यावरुन गुन्हयाचा अधिक तपास करता अमन झारेकरी यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याच्याकडुन आणखीन ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.

दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार करत आहेत. ही कारवाई पोलीस उप-आयुक्त परि. ३. संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग जगदीश सातव, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सपोनि राहुल नामदे तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक सचिन पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमित चिव्हे, अमोल दबडे, अनिस तांबोळी, सुर्या जाधव, सद्दाम शेख, पुरुषोत्तम गुन्ला यांनी केली आहे.

get_footer();