आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पत्रकार संघाच्या पुरस्कारासाठी बार्शी तालुक्याची निवड

Spread the love

व्हॉइस ऑफ मिडियाचे संस्थांतर्गत पुरस्कार जाहिर, संदिप मठपती उत्कृष्ट संघनायक

बार्शी : व्हॉइस ऑफ मिडियाच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पत्रकार संघाचा पुरस्कार बार्शीने पटकाविला आहे.

येत्या 26 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भव्यदिव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. याबाबत तालुकाध्यक्ष तथा उत्कृष्ट संघनायक संदिप मठपती यांना अभिनंदनाच्या लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

व्हॉइस ऑफ मिडिया ही संस्थाध्यक्ष संदीप काळे यांच्या दूरदृष्टीमुळे निर्माण झालेली पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी लढणारी, सकारात्मक पत्रकारितेसाठी दिशादर्शक असलेली संघटना असून, मागील तीन वर्षांच्या अल्पकाळातही जागतिक स्तरावरुन पत्रकारांच्या सर्वंकष उन्नतीसाठी कार्य करणारी अग्रगण्य संस्था म्हणून नावलौकिक निर्माण केलेली संस्था ठरली आहे.

संस्थांतर्गत कार्य करणाऱ्या विविध शाखांना मार्गदर्शन करीत असतांनाच त्यांच्यातील संघनायकांच्या उत्तम कार्याची दखल घेत, त्यांची प्रशंसा करण्यासाठी, इतरांना बरोबर घेवून पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांच्या नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी संघटनेने विविध पुरस्कारांची घोषणा केली आहे.

प्रदेश अध्यक्ष अनिल मस्के, राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ व राज्य पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात काम सुरु आहे. बार्शी शहर आणि तालुक्यात संघटनेची शाखा स्थापन झाल्यापासून पत्रकारांचे राज्यस्तरीय संमेलन व कार्यशाळा, पत्रकारांच्या परिवाराची आरोग्य तपासणी, विमा कवच, शिक्षण, घरकुलांसाठी प्रयत्न, पत्रकार भवनसाठी पाठपुरावा, आंदोलनामध्ये सहभाग असे विविध उपयुक्त उपक्रम राबवून संस्थेचा नावलौकिक निर्माण करण्यासाठी व इतरांना प्रेरणा देवून बार्शीचा नावलौकिक निर्माण केला आहे.

बार्शी तालुका पत्रकार संघाने मागील दोन वर्षात ग्रामीण भागातील पत्रकारांचे उत्कृष्ट संघटन केले आहे. या सर्व कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर केला आहे.

get_footer();