आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा

Spread the love

बार्शी : मतदानासाठी पात्र आसलेल्या बार्शी तालुक्यातील मतदारांनी आपली नाव मतदार यादीत समाविष्ट करत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी केले आहे.

शेख म्हणाले, मतदारसंख्येत योग्य ती वाढ करण्यासाठी व मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांना समाविष्ट करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

२४६ बार्शी विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख, ३२ हजार, २८ मतदार नोंदले गेले आहेत. पैकी १ लाख ७० हजार ९३० पुरुष आणि १ लाख, ६१ हजार, ५५ महिला मतदारांचा समावेश आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंख्येत २.५८ टक्के वाढ झाली आहे.

विशेषत : ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी मतदानाची सुविधा दिली जात आहे. एकूण ३३३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, यात ४ नवीन मतदान केंद्रांची भर करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि निर्भय होण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

get_footer();