आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पायी जाणाऱ्या आंबेगावच्या नागरिकास लुटणारा अटकेत

Spread the love

पुणे : भारती विद्यापीठ पोलीसानी पायी चालणाऱ्या नागरीकास मारहाण करुन लुटणाऱ्या आरोपीस जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ जुलै रोजी फिर्यादी हे विजयलक्ष्मी फरसाणच्या गल्लीत राही स्मृती बंगला, आंबेगाव पठार पुणे येथुन त्यांच्या घरी पायी जात असताना दुचाकी गाडीवरुन येवुन त्यांना मारहाण करुन त्यांच्या खिशातील ९,३००/- रु रोख रक्कम जबरदस्तीने चोरी करून नेले होते.

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयातील आरोपी पियुष गणेश भरम (वय २३ वर्षे रा. आंबेगाव पठार पुणे) यांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मितेश बोरमोले, अभिनय बौधरी, सागर बोरगे, अवधुत जमदाडे यांना आरोपी हा आंबेगाव पठार चिंतामणी ज्ञानपीठ, येथील हायवेकडे जाणाऱ्या रोडवर थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली.

त्यानुसार तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन त्याला अटक करुन त्याच्याकडुन गुन्हयात वापरलेली दुचाकी गाडी व रोख रक्कम असा मिळुन ५१,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ. स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे नंदीनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मितेश चोरमाले, अवधुत जमदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, निलेश जमदाडे, सतिश मोरे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();