आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पायी दिंडीचे भूम येथून प्रस्थान

Spread the love

भुम : भूम ते पंढरपूर माघवारी पायी दिंडीचे भूम येथून प्रस्थान झाले.

यावेळी पायी दिंडी सोहळ्याची पूर्ण शहरामधून पदयात्रा काढण्यात आली. पायी दिंडी सोहळा शहरातून बाहेर पडत असताना माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी दिंडीचे दर्शन घेतले. यावेळी शहाजी साबळे, श्रीराम भोसले, धनंजय शेटे, पिंटू कुंभार, अनिल शेळके, भांगे महाराज आदींची यावेळी उपस्थिती होती. गेल्या २५ वर्षांपासून भगवंत भजनी मंडळाच्या वतीने माघ वारी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. १२ फेब्रुवारी रोजी या दिंडीचे भूम येथून प्रस्थान झाले. देवांग्रा, धस, पिंपळगाव, अलीपूर रोड बार्शी, पापनस, उपळाई, आष्टी मार्गे पंढरपूर असा या दिंडीचा प्रवास राहणार आहे. २० फेब्रुवारी रोजी एकादशी दिवशी पंढरपूर येथे ही दिंडी पोहंचणार आहे.

get_footer();