आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पालखी प्रस्थानामुळे मंगळवारी वाहतुकीत बदल

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : दोन दिवसाच्या पुण्यातील मुक्कामानंतर मंगळवारी श्री. संत तुकाराम महाराज यांची पालखी श्री. निवडुंगा विठ्ठल मंदीर, नानापेठ, पुणे येथून सोलापूर रोड मार्गे पंढरपूरकडे प्रयाण करणार आहे. तसेच संत श्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पालखी विठोबा मंदीर, भवानीपेठ, पुणे सासवड रोडमार्गे पंढरपूरकडे प्रयाण करणार आहे. त्याकरीता रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळणेकरीता वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

दिनांक ०२/०७/२०२४ रोजी संत श्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज यांची पालखी निवडुंगा विठोबा मंदीर येथून निघून अरुणा चौक, समाधान चौक, पिंपरी चौक, ए.डी. कॅम्प चौक, रामोशीगेट चौकी चौक, भवानी माता मंदीर, मुक्ती फौज चौक, पुलगेट चौकी चौक, मम्मादेवी चौक, सोलापूर रोडने हडपसर गाडीतळ येथून सरळ सोलापूर रोडने लोणीकाळभोर मार्गे पंढरपूरकडे प्रयाण करेल.

तसेच संत श्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पालखी विठोबा मंदीर, भवानीपेठ, येथून रामोशीगेट चौकी चौक, भवानी माता मंदीर, मुक्ती फौज चौक, पुलगेट चौकी चौक, मम्मादेवी चौक, सोलापूर रोडने हडपसर गाडीतळ येथून उजवीकडे वळून सरळ सासवड मार्गे पंढरपूरकडे प्रयाण करेल त्यामुळे काही रस्ते पहाटे २.०० ते पालखी पुणे शहर आयुक्तालयाचे हद्दीबाहेर जाईपर्यंत पालखी व वारकरी असलेल्या मार्गावरील वाहतूक टप्प्या – टप्प्याने बंद करण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी या मार्गावर न येता दिले पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आवाहन पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे. सासवड कडून मुंबई नाशिक नगरकडे जाणारे व येणारे वाहनांनी खालील मार्गाचा वापर करावा.
अ) सासवड नारायणपूर कापूरहोळ कात्रज बायपास.
ब) सासवड बोपदेव घाट कात्रज बायपास.
१. भैरोबानाला चौक लुल्लानगर चौक कोंढवा खडीमशीन चौक बोपदेव घाट मार्गे सासवड किंवा
२. मंतरवाडी फाटा फुरसुंगी मार्गे ऊंड्री – पिसोळी खडी मशीन चौक मार्गे बोपदेव घाटाकडून सासवड या मार्गाचा वापर करावा पर्यायी मार्गाचा वापर करावा. सोलापूर कडून नगर नाशिक/मुंबई कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता.
अ) चौफुला केडगाव पारगाव नाव्हरे फाटा नगर रोड शिक्रापूर चाकण तळेगाव.
ब) थेऊर फाटा केसनंद वाघोली लोणीकंद नगररोड मरकळ मोशी.
१. सोलापूर कडून नगर/नाशिक/मुंबई कडे जाणाऱ्या- व येणाऱ्या वाहनांकरीता मार्गाचा वापर करावा.

get_footer();