आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पालखी सोहळ्यावर 5 हजार पोलिसांची राहणार नजर

Spread the love

वारकऱ्यांच्या वेशात पोलीस सहभागी होणार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : श्रीक्षेत्र देहू येथून जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. २८) प्रस्थान होणार आहे. तर, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (दि. २९) प्रस्थान होणार आहे. रविवारी (दि. ३०) दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होतील. पालखी सोहळ्यावर 5 हजार पोलिसांची नजर राहणार आहे.

पालखी सोहळ्यातील गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे भाविकांकडील ऐवज चोरी करतात, त्यामुळे सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरी रोखण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके साध्या वेशात गस्त घालणार आहे. यावेळी काही कर्मचारी वारकऱ्यांच्या वेशात सहभागी होणार आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून सुमारे ५ हजार पोलिसांचा फौजफाटा शहरात बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे.

पालखी सोहळा रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी (दि. २५) पालखी पुढे मार्गस्थ होणार आहे. नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे.

भवानी पेठेतील विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही आणि वॉच टॉवरद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी गुन्हे शाखेची खास पथके गस्त घालणार आहेत.

रविवारी (दि.३०) पालखीसोबत लाखो भाविक शहरात मुक्कामी असणार असून मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ठिकठिकाणी वाँच टॉवर, सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

पालख्यांचे शहरात आगमन होण्यापासून पालख्या शहरा बाहेर मार्गस्थ होईपर्यंत पोलिसांकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पाच हजार पोलीसांची सोहळ्यावर करडी नजर
अप्पर पोलिस आयुक्त ०२, पोलीस उपायुक्त १०, सहायक पोलिस उपायुक्त २०, पोलीस निरीक्षक १०१, सहायक पोलीस उपनिरीक्षक ३४३, पोलिस कर्मचारी ३,६९३, होमगार्ड ८००, राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी ०१.

get_footer();