आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना रद्द

maharashtra jain warta • Breaking News, Maharashtra News Networks, News, News Slider, Other, People, Police • January 13, 2026
Spread the love

पुणे : वादग्रस्त आयएएस पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना गेल्या आठवड्यात रद्द केला आहे. त्यांच्या बाणेर रोडवरील बंगल्यात नोकराने गुंगीचे औषध देऊन दरोडा टाकण्याची घटना शनिवार मध्यरात्री घडली होती. त्यात बेशुद्ध असलेल्या पाचही जणांची प्रकृती आता सुधारत आहे. पुजा खेडकर व त्यांच्या कुटुंबातील कोणीही पोलिसांना अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

मुळशी तालुक्यातील धडवली गावात एका शेतकऱ्याला मनोरमा खेडकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखविल्याची घटना २०२४ मध्ये घडली होती. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

त्यानंतर या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यासह ७ जणांवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध नवी मुंबईतील रबाळे व चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत नोटीस बजावली होती.

त्यानुसार त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना भेटून खुलासा केला होता. मात्र त्यांचा खुलासा समाधानकारक न वाटल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ६ जानेवारी २०२६ रोजी त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा आदेश काढला.

खेडकर यांच्या नॅशनल हौसिंग सोसायटीतील बंगल्यात नोकराने जेवणातून गुंगीचे औषध देऊन घरातील पाच जणांना बेशुद्ध केले होते. पुजा खेडकर यांचे हातपाय बांधून ठेवून घरातील चीजवस्तू व मोबाईल चोरून नेण्यात आले आहेत. मात्र खेडकर कुटुंबाकडून अद्याप कोणतीही माहिती न दिल्याने चोरट्यांनी घरातून नेमके काय चोरून नेले, याचा तपशील समोर आलेला नाही.

get_footer();