आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यात 14 वर्षाच्या मुलाने चालवला टँकर, 4 जणांना चिरडले

Spread the love

पुणे : पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी येत असताना पोर्शे कार अपघातानंतर शनिवारी आता वानवडी परिसरात आणखी एक भीषण अपघात झाला आहे.

एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने वेगाने टँकर चालवत अनेकांना उडवले. या अपघातात सकाळी बाहेर पडलेल्या मुलांना, तसेच एका दुचाकी चालक महिलेला धडक दिली. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. त्यामुळे एकच पळापळ झाली.


व्यायामासाठी निघालेल्या मुलांना या टँकरने धडक दिली. यात एका दुचाकी चालक महिलेलाही धडक दिली. या अपघातात काही मुलं आणि महिला जखमी झाल्या आहेत. हा टँकर 14 वर्षीय मुलगा चालवत होता, नागरिकांनी टँकरसह अल्पवयीन मुलाला पकडून ठेवले आहे.

दुचाकीवरुन महापालिकेचे अधिकारी संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होती. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यवरुन धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरुन उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर टँकरखाली दोन मुली आल्या. स्वत: ढुमे यांनी टँकरखाली आलेल्या मुलींना बाहेर काढले.

पुण्यातील मे महिन्यातील पोर्शे कार अपघातानंतर अनेक भीषण अपघात झाले आहेत. एका हायवा ट्रकने मार्केटयार्ड येथे एका महिलेला चिरडले. तर कात्रज येथे एसटी बसच्या धडकेत अभियंता तरुणीचा मृत्यू झाला. उंड्री येथे ट्रक दुचाकीच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.

get_footer();