आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यात 27 किलो गांजा जप्त, गांजा विक्री करणारे अटकेत

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Police, Social • February 17, 2024
Spread the love

अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची कारवाई

पुणे : शिरपुर जिल्हा धुळे येथील सिव्हील इंजिनिअर साथीदारासह पुण्यात गांजा विक्री करण्याकरीता आलेल्या इसमांना अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी २७ किलो ३२५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक १ मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे हे त्यांच्या स्टाफ सोबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांना काही इसम हे भारती विद्यापीठ कात्रज येथे गांजा विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी स्टाफसह सापळा रचुन हरीओम संजय सिंग (वय २१ वर्षे, रा. बी.एस.एन.एल टॉवर मागे, मोहाडी बैंक ऑफ बडोदा जवळ, धुळे). करण युवराज बागुल (वय २३ वर्षे, शिक्षण सिव्हिल इंजिनिअर रा, पदमावती कॉलनी मांडाळ शिवार प्लॉट नं.०२, ता. शिरपुर जि. धुळे) यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून ४ लाख ८३ हजार ८००/- रु कि.चा ऐवज त्यामध्ये त्यात २३ किलो ९० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व दोन मोबाईल फोन मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.

हरीओम संजय सिंग हा इलेक्ट्रीकची कामे करीत असुन करण युवराज बागुल हा सिव्हिल इंजिनिअर आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी वसंत सुभाष क्षीरसागर (रा. अआंबेगाव बा पुणे) याचा शोध घेतला असता त्याच्या राहत्या घरी सापडला.

घराची झडती घेतली असता त्याचे जवळ किं.रु ८४,७००/- चा ०४ किलो २३५ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, कि.रु. ६२,०००/- चे दोन मोबाईल फोन, किं.रु २०००/- चा एक इलेक्टॉनिक वजन काटा, कि.रु.००/- चे रिकाम्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा बंच असा ऐवज मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक झेंडे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

get_footer();