आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यात 37 लाखाचे अमली पदार्थ जप्त

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police • February 17, 2024
Spread the love

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची कारवाई

पुणे : विश्रांतवाडी व वानवडी भागातील नागरीकासह ३७ लाख ३० हजार रु किं.चा कोकेन, मॅफेड्रॉन (एम.डी.) व गांजा हे अंमली पदार्थ जप्त केले.

अंमली पदार्थ विरोधी पथक २, चे स्टाफ हदीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाली की मिरॅकल लाईफ स्पेस सोसायटी समोर, उंड्री येथील सार्वजनिक ठिकाणी परदेशी नागरीक हसेनी मुवीनी मीचौगा (वय-३५ वर्षे, रा. स.नं.४३/२, ब्रम्हानंद बिल्डींग, उंड्री C/o) सुनिल देवीदत्त मिश्रा यांचेकडे भाडयाने राहत होता.

मुळचा टांझानियाचा आहे. ३० लाख ४० हजार रु.कि.चा १५२ ग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करून त्याचे विस्थ्द कोंढवा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेले बातमीनुसार माधवनगर रोड, नंबर १, अगत्य हॉटेल, धानोरी लोहगांव रोड पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी किसन नंदकिशोर लधार, (वय ३४ वर्षे, रा रूम नं. १०१ न्यू दर्शन कॉलनी, कलवड वस्ती, लोहगांव, पुणे) याच्या ताब्यातुन एकुण ४ लाख ५०,हजार रु. कि.चा २२ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुब्द विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार रविंद्र रोकडे यांना मिळालेले बातमीनुसार इम्प्रेस गार्डन गेट समोर घोरपडी पुणे येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी ओकांर अनिल चंडालिया, (वय २१ वर्षे, रा. उरुळी कांचन तुपे वस्ती, ढमढेरे बिल्डींग ता हवेली जि पुणे) याच्या ताब्यातुन कि.रु.२ लाख ४० हजार चा ९ किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त केला. त्याच्या विरुब्द वानवडी पोस्टेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

get_footer();